मेहकर पोलिसांनी पकडला ७७,००००० चा प्रतिबंधीत गुटखा ...

(महेश गोंधणे):-दिः २१ऑगस्ट रोजी पहाटे मेहकर ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की समृदधी महामार्गावरुन एका आयशर वाहनातुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक होत आहे यावरुन त्यांनी सदर माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन पहाटे ०४:०० च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपुर ते मुंबई वाहीनीवरील चॅनल नंबर २८२ जवळ मिळालेल्या माहीतीचे अनुषंगाने सापळा लावुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक करणारा एक आयशर टेम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्या भरलेला शासन प्रतिबंधित गुटखा असल्याचे निष्पन्न झाले असता मुद्देमालावर कारवाई करणेकरीता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना बोलावुन घेवुन मुददेमाल तपासला असता एकुण ६५,५२०००/- रु चा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व १२,००००० रु चे आयशर वाहन असा एकुण ७७,५२०००/- रु चा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. सदर गुन्हयात आता पर्यंत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजुन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर ठाणेदार व्यंकटेश आलेवार हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार,सपोनि संदीप बिरांजे,पोउपनि वसंत पवार, पोउपनि गणेश कड, पोउपनि संदीप मेधने,पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई,रमेश गरड,संजय पवार,सुरेश काळे, लक्ष्मण कटक,प्रभाकर शिवणकर,शरद कापसे,करीम शहा,इब्राहीम परसुवाले,शिवाजी चिम,संदीप भोंडणे यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांचे सहकारी यांनी मिळुन केलेली आहे.
Previous Post Next Post