बुलढाणा एलसीबी ची धडक कारवाई घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त...

(महेश गोंधणे):-सोप्या आणि सुलभ पद्धतीने सहज मिळणारे घरगूती सिलेंडर सणा सुदीच्या काळात सुट्ट्यांमुळे म्हणा की तांत्रिक तुटवडा होतो का ?असा प्रश्न काल रात्री बुलढाणा एलसीबी ने केलेल्या कारवाईने सुलतानपूर व आजूबाजूच्या गावात चर्चेचा विषय बनला आहे.
सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरचा काळाबाजर केला जातो.याला आळा बसावा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे असे काल रात्री च्या कारवाईने दिसून येते. घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक वापरसाठी होतांना दिसतो. कोणती ही नोंदणी न करता महागड्या किंमतीत हे सिलेंडर विकल्या जातात. त्याविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. सुलतानपुर येथे ११५ घरगुती वापराचे भारत गॅस कंपनीचे आणि एचपी कंपनीचे ५६गॅस सिलेंडर एलसीबीच्या पथकाने असे मिळून १७१ सिलेंडर (अंदाजे किंमत ८ लाख ३० हजार रु) ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ३,७ ईसी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने एएसआय राजकुमार राजपूत, हेकाँ गजानन दराडे, दिनेश बकाले, सतीश मुळे, वनिता शिंगणे, पोकाँ अरविंद बडगे, वैभव मगर, राहुल बोर्डे यांच्या पथकाने केली आहे.
Previous Post Next Post