महेश गोंधणे-
गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा,गोमाते ची सुरक्षा व्हावी, गोमातेचा सम्मान व्हावा अश्या विविध मागण्यांसाठी देशभरात सुरू असलेल्या ' गो सम्मान आव्हान अभियान' अंतर्गत २७ एप्रिल रोजी चिखली येथे तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान,मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर हजारो गोभक्ता च्या स्वाक्षऱ्या असल्याने या उपक्रमाला मोठे जनसमर्थन लाभल्याचे स्पष्ट झाले.
सदर निवेदनात राज्यातील देशी गोमतेचे संरक्षण, गोमाते ला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी,गोहत्या बंदी बाबत कठोर कायदे, गोआधारित अर्थव्यवस्था बळकट करणे, तसेच गोशाळा,नंदीशाळा, गोचिकित्सा सुविधा उभारण्या सारख्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश करण्यात आलाआहे.गोसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर देण्यात यावा व या संदर्भात शासनाने ठोस, सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदना सोबत गो भक्तांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थन सूचीही सादर करण्यात आली. दरम्यान, शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थित गोभक्तांनी व्यक्त केली. या मोहिमेचे अध्यक्ष नंदी बाबा व प्रधान संरक्षक गोमातेच्या नेतृत्वात चिखली शहरातून मिरवणुकी द्वारे वाजत गाजत स्वाक्षरी युक्त निवेदन पाळी पाळीने सर्व उपस्थितांनी डोक्यावर घेउन मिरवणूकीत रंगत आणली. निवेदन देतांना आंतरराष्ट्रीय कथा वाचक विवेकदास शास्त्री महाराज व प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. त्रिवेणी दीदी देशमुख,परिसरातील सकल हिंदू समाज तसेच गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसर गोमाता राष्ट्रमाता, गो हत्या बंद झालीच पाहिजे या घोषणांनी दणाणले होते. याप्रसंगी गो सम्मान आव्हान अभियान समितीच्या वतीने प्रसाद रूपाने फराळाचे वाटप करण्यात आले.
