गो सम्मान आव्हान अभियान निमित्त चिखलीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन..


महेश गोंधणे:-

चिखली नगरातील व तालुक्यातील सर्व गो -प्रेमी नागरिक बंधूभगिनींना आवाहन करण्यात येते की, देशातील सर्वसाधू संतांच्या आवाहनाने यापुढे संपूर्ण देशात २७ एप्रील हा दिवस गो-सन्मान दिवस म्हणून पाळल्या जाणार आहे.या अनुषंगाने चिखली तालुक्याचा गो - सन्मान दिवस खालील प्रमाणे साजरा केल्या जाणार आहे .

दि. २६ एप्रिल रोज रविवारी सायंकाळी ७ वाजता मौनी बाबा संस्थान येथे राजस्थानचे संत प .पू. बालकृष्णजी महाराज यांचे प्रवचन होणार असून २७ एप्रील रोज सोमवारी सकाळी ९ वा . प.पू. विवेकदास शास्त्री महाराज वाराणशी यांची गो - कथा आयोजित केली आहे . कथा संपल्यावर तेथे प्रसाद वितरीत झाल्यावर तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी मिरवणूक निघणार आहे .

गो - मातेला राष्ट्रमाता घोषित करावे, गोहत्या व गो - धन तस्करी बंद व्हावी या मागणी साठी स्वाक्षरीयुक्त निवेदन देण्यासाठी विशाल नंदीबाबाच्या नैतृत्वात स्वाक्षरीयुक्त निवेदन मा.तहसीलदार मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा राज्यपाल व मा .मुख्यमंत्री यांना देण्यात येणार  आहे तरी सर्व नागरिक बंधू, माता भगिनी, विद्यार्थी, मुले, मुली यांनी जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीत सहभागी व्हावे आणि हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे .

Previous Post Next Post