बाबासाहेब चैतन्याचा झरा.. आजही बाबासाहेबांच्या स्मृती येथे दरवळतात....आ.सौ.श्वेता महाले पाटील


(महेश गोंधणे):-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेले असता ते लंडन मधील ज्या घरात वास्तव्यास होते,ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर (10,किंग हेन्री रोड, लंडन),चे महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून विकत घेतले आणि त्या घराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बाबासाहेब यांच्या आठवणीशी संबंधित विविध वारशाचे संग्रहालय सुरू केले. त्या ठिकाणी आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे आणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत आ.श्वेता महाले यांनी आज भेट दिली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी आपली सुमनांजली अर्पण केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा निवडणुकीपुरता वापर करून काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता सांभाळली असली तरी बाबासाहेबांच्या लंडनमधील घराचे संवर्धन, त्याचे संग्रहालयात रूपांतर, याबाबत त्यांनी फारसा पुढाकार कधीही घेतला नाही.
बाबासाहेबांच्या वारशाचा सन्मान करण्यापेक्षा त्यांनी नेहरू परंपरेवर अधिक भर दिला.त्यामुळे या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून जपण्यासाठी काँग्रेसकडून लक्षणीय काम कधीही झाले नाही.
 याउलट भाजप सरकारने (विशेषतः महाराष्ट्र सरकारने) बाबासाहेबांच्या लंडनमधील घराचे जतन करण्याची ठोस भूमिका घेतली.२०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने हे घर विकत घेऊन तेथे “डॉ. आंबेडकर मेमोरियल” स्थापन केले.भाजप सरकारने बाबासाहेबांना ‘आयकॉन ऑफ सोशल जस्टिस’ मानून त्यांच्या जागतिक स्मृती स्थळांचे जतन करण्याचा प्रयत्न केला.असे आ.सौ श्वेता महाले म्हणाल्या.
या उपक्रमाला केवळ स्मारक म्हणून नव्हे तर “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक” म्हणून सादर करण्याची मानसिकता भाजपकडून दिसली.आणि त्यामुळे 2015 मध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी 35 कोटी रुपये खर्च करून भारतासाठी लंडनमध्ये एक अभिमानाचे प्रतीक उभे करून ठेवले. 104 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे राहत असताना जे लंडन स्वतःच्या स्मृती सोबत भारतात नेले त्या स्मृतिचा दरवळ आजही येथे जाणवतो असे आमदार सौ.श्वेता महाले  म्हणाल्या.
Previous Post Next Post