जुन्या वादातून सैलानी येथे गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा खून परिसरात एकच खळबळ....


चिखली(महेश गोंधणे):-जुन्या वैमनस्यातून एकाचा खून सैलानी येथे आज पहाटे एका युवकाला भोसकून खून करण्यात आला इंदिरानगर बुलढाणा येथील रहिवाशी व ऑटोचालक शेख नफीज शेख हाफीज उर्फ बाब्या वय ३८ वर्ष याचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला ही घटना आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी साधारण सकाळी एक वाजे दरम्यान बरीवाले बाबा दर्ग्या जवळील झोपडी समोर घडली फिर्यादी शेख हाशिम शेख हाफिज राहणार इंदिरानगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत हाफीज हा अधून मधून सैलानी येथे येऊन अवैध धंदे करीत असे काही दिवसांपूर्वी त्याचा आरोपी अलेक्स इनॉक जोसेफ उर्फ रोनी, शेख सलमान शेख व स.वाजिद स. राजू उर्फ वाजिद टोपी यांच्यासोबत वाद झाला होता याच रागातून शनिवारी त्याला गाठले प्राप्त माहितीनुसार समोरचे आरोपी व मृतक यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला राफ्टरने मारहाण करून नंतर त्याच्या छातीत चाकू खुपसून संपवून टाकले घटना झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते .पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे तीन जणांना ताब्यात घेतले आहे मृतक हाफीज उर्फ बाब्या पाकीटमार होता मारहाणीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव होते त्याला बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून तडीपार शुद्ध करण्यात आले होते तो सध्या एका राजकीय पक्षात काम करत होता आणि रायपूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये तयारी करत होता असे समजले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली सकाळी ७.३० ते ९ या वेळेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला या प्रकरणी अ.प.क्र १४६/२०२५ भा.दं.सं. कलम १०३(१),३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Previous Post Next Post