फिर्यादी कासुबाई पांडुरंग खरात (वय ६५) व त्यांची मुलगी ज्योती सरदार या सैलानी बाबाच्या दर्शनासाठी चिखली बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी सुमारे १.३० वाजता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत तीन अनोळखी महिलांनी फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची पोत (२ डोरले व २६ मण्यांची, अंदाजे ३ ग्रॅम किंमत २७,००० रुपये) जबरीने खेचून पळवली. फिर्यादींनी आरडाओरड केल्यानंतर ड्युटीवरील पोलीस हवालदार सावळे यांनी त्वरित धाव घेत आरोपी महिलांना थांबवले. विचारपूस केल्यानंतर त्या महिलच्या संशयास्पद वागणूक व उडवाउडवीची उत्तरे या मुळे त्यांनी त्या महिलांना थांबवले व चौकशी केली असता समजले की या महिलांनी हे कृत्य केले आहे.
सदर प्रकरणात अटक केलेल्या आरोपीं महिला
१) संगीता विलास पवार (वय ३५, रा. विरेगाव, जालना)
२) निशा राहुल धोत्रे (वय २४, रा. रेवकी, ता. गेवराई)
३) शेषुबाई पांडुरंग पवार (वय ४४, रा. मंगरूळ, ता. घनसावंगी, जि. जालना)
चिखली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून, गुन्हा क्र. ६५५/२०२५ अंतर्गत भा. दं. सं. कलम ३०९ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी निशा धोत्रे हिच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास व अटक कारवाईत डी.बी. पथक प्रमुख पोउपनि समाधान वडणे,सफौ राजेंद्र काळे, पोहेकॉ विजय किटे,पोना अमोल गवई,पोकॉ प्रशांत धंदर ,पोकॉ अजय इटावा ,पोकॉ पंढरीनाथ मिसाळ,पोहेकॉ निलेश सावळे ,पोहेकॉ राहुल पायघन आणि मपोकॉ रुपाली उगले यांचा समावेश होता.