भजनी मंडळानी या योजनेचा लाभ घ्यावा... आ.सौ.श्वेता महाले.
याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे,अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
यासंदर्भात बोलतांना चिखलीच्या आ.सौ.श्वेता महाले यांनी ''भजनी मंडळाचे सामाजिक योगदान खूप महत्त्वाचे आहे.पारंपरिक भजनी मंडळे केवळ धार्मिक कार्यक्रमा पुरते मर्यादित नसून त्यांनी समाज जीवनात अनेक सकारात्मक भूमिका निभावल्या आहेत.भजनी मंडळ समाजाला धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक आणि नैतिक अशा अनेक पातळ्यांवर एकत्र आणतात व उन्नतीकडे नेतात.त्यामुळे भजनी मंडळ यांना शासनातर्फे काय मदत करता येईल यासंबंधी शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय नेहमी प्रयत्नशील असते'' असे आ.श्वेता महाले यांनी आपले मत व्यक्त केले.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट,२०२५ ते ०६ सप्टेंबर,२०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या सौ.श्वेता महाले यांनी केले आहे.