बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियन्स मध्ये मिहीर अपारला सुवर्ण पदक....


चिखली (महेश गोंधणे):-  नुकत्याच पार पडलेल्या "युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियन्स "स्पर्धेत बुलढाणा येथील युवकाने आपल्या नेतृत्वाखाली  उंचवली  जिल्ह्याची मान जिंकले सुवर्णपदक ,कॅनडा येथे दिनांक 15 ऑगस्ट  ते दिनांक 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडलेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चम्पियन स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपद‌क प्राप्त झाले आहे. जर्मनी सोबत झालेल्या अंतिम सामन्यात अतिशय चुरशीच्या लढाईत भारतीय संघाने टाय शॉर्ट मध्ये डॉट मारून जर्मन संघाचा पराभव केला. भारतीय संघामध्ये बुलढाण्याचा मिहर नितीन अपार, हरियाणाचा कुकल हलाल व आंध्र प्रदेशाचा गणेश मणिरत्नम यांचा समावेश होता. मिहीर नितीन अपार ने भारतीय संघाचे नेतृत्व करत भारतीय संघासाठी सुवर्ण वेध साधत सुवर्णपदकाची कमाई केली. गोल्डन बॉय मिहीरने या अगोदरही भारतीय संघाचे नेतृत्व करत पोलंड येथे भारतीय संघाला सुवर्णपदक व
मागील महिन्यात सिंगापूर येथे रजत पदक प्राप्त करून दिले होते. मिहीर अपार मागील बारा वर्षापासून प्रशिक्षक 
      चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षकांना देतो. त्याला मिळाल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post