मौजे केळवद येथील संजिवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता. चिखली, जि बुलढाणा संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर ,माजी आमदार रेखाताई खेडेकर ,बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे लाडके खासदार आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव ,आ.संजय गायकवाड,आ.श्वेताताई महाले व महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी इतर मान्यवर. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र राष्ट्रमाता जिजाऊंचा फोटो देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, कृषी, कवी, साहित्य, लेखक, पत्रकार ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका , कृषी सहाय्यक ,तलाठी , प्राचार्य , शिक्षक, शिक्षका, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केल्या जाणार आहे. त्यामध्ये विधवा, घटस्फोटीत महिलांचा परिचय मेळावा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे . बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधवा ,घटस्फोटीत महिलांनी परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी आपली उपस्थिती द्यावी त्यामध्ये सर्व विभागाचे जिल्हा अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. असे आवाहन एकल महिला नारी संघटनांच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. उज्वला निवृत्ती जाधव यांनी केले आहे. तरी कार्यक्रमाचे आयोजन ०६/०६/२०२६ रोजी सकाळी ११ ते ३ , सामाजिक न्याय विभाग सभागृह येथे पार पडणार आहे.तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान संजिवनी जाधव यांनी केले आहे.