विदर्भ वंदन न्यूज- महेश गोंधणे
दिनांक ८/३/२०२६ रविवार रोजी संजिवनी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि बुलढाणा या संस्थेमध्ये महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ शांताबाई विठ्ठलराव जाधव अध्यक्षा संत कबीर महिला बचत गट केळवद माजी सदस्य विविध कार्यकारी सोसायटी. प्रमुख पाहुणे म्हणून मिलींद भंडारे कवी, शाहु फुले समास्क समीती अध्यक्ष चिखली, कवि मनोहर पवार, संजिवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ निवृत्ती जाधव हे होते. राजमाता जिजाऊंच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना नियोजित संजिवनी लाडकी बहीण महिला अर्बन को आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली चिखली ता चिखली जि बुलढाणा या पतसंस्थेच्या मुख्यप्रवर्तक सौ उज्वला निवृत्ती जाधव यांनी लाडक्या बहिनी विषयी महिलांना मार्गदर्शन केले. शाहिर मनोहर पवार यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ कविता सादर केली. सर्व महिलांनी महापुरूषांच्या व माहामात्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पन करून अभिवादन केले महिलांना महिला सक्षमीकरणासाठी एकत्रीत आन्याचे काम खऱ्या अर्थाने संजिवनी संस्थेच्या माध्यमातून होत आहे. डॉ निवृत्ती भाऊ जाधव दरवर्षी 5 मे ला सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात व 26 मार्च ला वृक्षरोपण कार्यक्रम राबवतात. तसेच महिला सक्षमीकरण, बेटीबचाओ बेटा पढाओ, व्यसनमुक्ती, हुंडामुक्ती, दारूबंदी, कामगारांना भांडे वाटप पेटी वाटप, सामाजिक कार्य करनायऱ्यांना संजिवनी पुरस्कार, स्वच्छता अभियान विविध प्रशिक्षण, व जिल्हयाभरात समाज प्रबोदन सातत्याने करत असतात. तसेच युवक व युवतींना मार्गदर्शन करतात याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळालेले आहेत तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत. शेकडो महिलांच्या उपस्थिती मध्ये महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती मध्ये ज्योती जाधव उद्यनगर, प्रिती ठाकरे बुलढाणा, संध्या ठाकरे मोताळा, वैष्णावी मोरे इसोली, कविता सोनाळकर लाखनवाडा, अनिता हाजारी शेलुद, संध्या मोरे संभाजी नगर कल्पना डोंगरदिवे मेरा, दशर्थ बेटके मेहकर, नंदा कांबळे छत्रपती संभाजी नगर, सोनल निकाळे चिखली, साधना मोरे, वर्षा वाघ, अनिता इंगोळे टाकळी, मालती मार्के मलकापूर इत्यादी जिल्हयातील महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्र
संचालन संजिवनी जाधव यांनी केले व आभारप्रदर्षण धनराज जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न होण्यासाठी सुभाष जाधव यांनी अथक परिर्षम घेतले.