चिखली शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीने गाठला कळस

 महेश गोंधणे-Vidarbhavandannews







(चिखली):-अवैध दारूविक्री सुरू असून सदर विक्रीला अधिकारी वर्गाचा मूक पाठिंबा की अजून काही कारण ?  अवैध दारू विक्री वर पोलीस प्रशासन कार्यवाही तर करत आहे तरीही अवैध दारू विक्रीला संपूर्ण प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत नाही . या अवैध दारूविक्री मूळे ग्रामीण भागात तर कितेक संसार उघड्यावर पडल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. चिखली दारूबंदी विभाग फक्त हफ्ते घेण्यातच पुढे असून कोणतीच ठोस कार्यवाही करतांना दिसून येत नाही. चिखली शहरात तर सर्रास सरकारी परवाने असलेल्या दारू दुकाना जवळ काही अवैध मद्य तस्करांनी दुकाने लाऊन आपला व्यवसाय खुलेआम थाटला आहे. संबंधित परवाना धारकांचे यामुळे नुकसान होत आहे.अवैध दारूविक्रीमुळे सकाळ पासून शहरात व्यसनाधीनता वाढत असून याकडे प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध दारू व्यावसायीक व प्रशासकीय यंत्रणेत यामुळे काही मिलीभगत तर नाही ना असेही बोलल्या जात आहे.
तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळे आधी आणि वेळे नंतर काही शॉप्या आणि बार सुरू असतात त्यामुळे उशिरा पर्यंत मद्य शौकीन दारू प्राशन करून अनेक चौकात भांडण तंटे करतांना दिसून येतात.
प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित शहरी व ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीवर सपशेल दुर्लक्ष असल्याने कायदा व सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.चिखली शहरात एकमेव असलेल्या वाईन शॉपी वरून शहरात व ग्रामीण भागात राजरोसपणे बॉक्सच्या बॉक्स दारूविक्री होते हे तर काही लपून नाही. यालाच अधिकची जोड म्हणून शहरातील कित्तेक बार शॉपिवरून माल आणून सर्रास विक्री करीत आहेत. या गंभीर
बाबीकडे दारूबंदी विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असून जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत तर नाही ? अशी शंका उपस्थित होत आहे यामुळेच शहरा सह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे थैमान सुरू आहे.
शहरातील कित्तेक भागात २४ तास अवैध दारू उपलब्ध होत असल्याने झिंगलेले महाभाग घरच्यांनाच नाही तर नागरिकांना देखील जेरीस आणून सोडत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे कोणाच तरी चांगभल होत असल तरी कित्येक आई बहिणीचा असल्या अवैध दारू विक्रीला विरोध असून घरात शांती राहावी नाईलाजस्तव त्या चूप आहेत.परंतु आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना काही मायमाऊली अवैध दारूबंदी साठी लवकरच एल्गार पुकरणार असल्याचे सांगत आहे.
प्रशासनाने(दारूबंदी विभाग) लवकर या वर ठोस निर्णय घेऊन अवैध दारू विक्रीला कायम स्वरूपी आळा घालावा .
Previous Post Next Post