ग्रामहिताच्या निर्णयानंतर सरपंचांकडून आमदार श्वेता महाले यांचा कृतज्ञताभावाने सत्कार...




(चिखली):-राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाबाबत आ.सौ.श्वेता महाले यांनी केलेल्या मागणीला यश मिळाल्यानंतर चिखली व परिसरातील सरपंचांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने अधिकृत राजपत्राद्वारे अधिसूचना प्रसिद्ध करत विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून जबाबदारी देण्याचा मार्ग मोकळा केल्याने ग्रामपंचायतींच्या कामकाजात सातत्य राहणार आहे.
या निर्णयाबद्दल आभार मानण्यासाठी चिखली तालुका सरपंच संघटना तसेच आसपासच्या तालुक्यांतील सरपंच चिखली येथे एकत्र आले. यावेळी आ. श्वेता महाले यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल-श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंचांनी सांगितले की, “लोकनियुक्त प्रतिनिधींनाच प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्याने ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज, विकासकामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होणार आहे.आ. सौ.श्वेता महाले यांनी ग्रामहितासाठी घेतलेली भूमिका आमच्यासाठी दिलासादायक ठरली आहे.ग्रामहिताच्या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय मिळवून देणाऱ्या आमदार सौ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले. या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदारसंघासह परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे..”असे  सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले.
आ.सौ.श्वेता महाले यांनी उपस्थित सरपंचांचे आभार मानत सांगितले की, “गावांचा विकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षम प्रशासन हीच आपली प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधींना जबाबदारी दिल्यास पारदर्शक व परिणामकारक कारभार शक्य होतो.”
याप्रसंगी चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पा.भुतेकर, मेहकर तालुका अध्यक्ष अरुण दळवी, अमडापूरचे सरपंच संजय गवई, अंत्री (खेडेकर)चे सरपंच सचिन खेडेकर, मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार, आमखेडचे सरपंच जगन्नाथ वाघ, किन्होळ्याचे सरपंच वसंतराव जाधव, पेठचे सरपंच विष्णू शेळके, टाकरखेड मुसलमानचे सरपंच ज्ञानेश्वर डहाके, बोरी (मेहकर)चे सरपंच अनंतराव चनखोरे, धोत्रा भनगोजीचे सरपंच गुलाबसिंग सोनारे यांसह अनेक सरपंच उपस्थित होते...
Previous Post Next Post