| केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणी आ.श्वेता महाले यांची प्रमुख उपस्थिती |
महेश गोंधणे-
आई रेणुका मातेच्या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त चिखली नगरी आज भक्तीभावाने न्हाऊन निघाली. चिखली शहरातून मार्गस्थ झालेल्या वहन मिरवणुकीचे खामगाव चौफुली येथे चिखली विधानसभेच्या आ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वात चिखली शहर महायुतीच्या वतीने पुष्पवृष्टी करून भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अधिकच भव्य ठरला.
पुष्पवृष्टीच्या त्या पवित्र क्षणी वातावरणात श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा अपूर्व संगम अनुभवायला मिळाला. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आई रेणुका मातेच्या कृपेची झलक स्पष्टपणे दिसत होती.
आ. श्वेता महाले यांनी आई रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
यावेळी विद्याधर महाले (मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव), नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, विलास घोलप,भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, कपिल खेडेकर,राहुल सवडतकर,भास्कर राऊत, बळीराम काळे,माया म्हस्के (जिल्हा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी), कैलास भालेकर यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
