चिखली हादरली ! १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी गजाआड, ' पोक्सो 'चा गुन्हा दाखल


(चिखली):-तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील एका २२ वर्षीय नराधमाने एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली असून, चिखली पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलगी ही चिखली तालुक्यातील शेलुद परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी सागर शेषराव सुरडकर (वय २२, रा. डोंगर खंडाळा) याने १५ जून २०२५ पासून ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पीडितेला घरी एकटे पाहून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही घटना ‘वळती’ शेत शिवार परिसरात घडली.​पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. वैद्यकीय तपासणी दरम्यान पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने आरोपी सागर सुरडकर याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या आईने १३ फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.पोलीस कारवाई आणि गुन्ह्याची कलमे पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे  भारतीय न्याय संहिता अंतर्गत (BNS) ६४(२)(f), ६४(२)(h), ६४(२)(i), ६४(२)(m), ६५(२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६ ,१०,१२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे आणि रोहिदास पंढरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Previous Post Next Post