अर्थसंकल्प अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध अर्थसाह्य व स्वयंरोजगाराच्या योजना राबवून महिलांनी सक्षम बनावे..... जिल्हाध्यक्षा सौ सविता पाटील

         चिखली येथे अर्थसंकल्प ह्या विषयावर महिला संमेलनाचे आ.श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते त्या विषयावर नुकत्याच सादर करण्यात आलेल्या २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्प अंतर्गत महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक योजना व तरतुदी तसेच स्वयंरोजगारासारख्या योजना राबवून महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता उद्योग धंदे उभारून  सक्षम बनावे असे आवाहन भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा सविताताई पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिला व युवतींना केले त्या स्थानिक श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पाबाबत आयोजित केलेल्या महिला संमेलनामध्ये बोलत होत्या यावेळी मंचकावर  कांचन पाटील,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सिंधु तायडे,उपाध्यक्षा नीता जैन सचिव ,श्रीमती सुनंदा शिनगारे जिल्हा सचिव,अर्चना खबुतरे ,तालुका अध्यक्षा नीता सोळंकी ,शहर कार्याध्यक्ष कविता मुळे शहर सचिव प्रीती देशमुख शहर उपाध्यक्षा छाया खरात.विजया उबरहंडे महिला व बालकल्याण  सभापती सुषमा ,चव्हाण प्रिया बनसोडे  आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या यावेळी कांचन पाटील ,प्रमुख वक्त्या प्राध्यापिका अश्विनी मेहेत्रे , सौ निता जैन ,सुनंदा शिनगारे, तसेच सौ नीता सोळंकी यांनी त्यांच्या भाषणांमधून केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये महिलांसाठी समावेश असलेल्या विविध आर्थिक योजना स्वयंरोजगार निर्मिती तसेच उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज योजना त्यामधून मिळणारे शासकीय अनुदान महिलांना आधुनिक काळाशी जोडण्यासाठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाइन व्यवसाय संधी व सायबर क्राईम पासून संरक्षण करण्यासाठी डिजिटल साक्षरता व इंटरनेट सुरक्षिततेचे प्रशिक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले सदर महिला संमेलनासाठी चिखली तालुका भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी भाजप तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते  नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले .. महिला संमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम वाकतकर यांनी केले तर सौ.तायडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
Previous Post Next Post