सिद्ध सायन्स मंदिर चिखली येथे शिक्षकांना इको ब्रिक्स(Eco Bricks) बनविण्याची दिली माहिती...

(महेश गोंधणे):-सिद्ध सायन्स मंदिर चिखली येथे पर्यावरण संरक्षण गतिविधि चे विभाग संयोजक व कचरा प्रबंधन विदर्भ प्रांत सह संयोजक ओमप्रकाश गोंधणे यांनी शिक्षकानां इको ब्रिक्स (Eco Bricks) कशी  बनवावी याची दिली माहिती. 
पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करून आपण पेड, पाणी व पॉलिथिनचा मर्यादित वापर करून,या धरती मातेला हिरवा शालू परिधान करून देऊ. तसेच पॉलिथिन किंवा सिंगल युज प्लास्टिक जमिनीचे संपर्कातच येणार नाही याची दक्षता घ्यावी व विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवनात या गोष्टीचा न विसरता उपयोग करावा. 
 उपयोगात आलेले प्लॅस्टिक पाण्याच्या खाली बॉटलमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्स बनवावे,पाण्याचा मर्यादित वापर करून पाणी वाचवावे,जगभरात प्रतिव्यक्ती 500 पेक्षा जास्त वृक्ष आहेत मात्र भारतात ही संख्या फक्त 28 आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. 
 मागील महिन्याभरात संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रात सुद्धा ढगफुटीचे व दरड कोसळण्याचे प्रकार होऊन मोठ्या प्रमाणात जीवहानी, पिकांचे व संपत्तीचे अतोनात नुकसान झालेले आहे. 
 मानवाला यापूर्वी विकासाची एवढी प्रचंड किंमत कधीच मोजावी लागलेली नाही. आपण आता तरी जागृत होऊन निसर्ग आधारित भारतीय प्राचीन जीवनशैली आत्मसात करावी.
 अशा प्रकारचे निसर्ग प्रेमाचे आवाहन ओमप्रकाश गोंधणे यांनी केले.🌳🌹🌳
Previous Post Next Post