चिखलीत दिव्यांग बोर्ड व मोफत सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन.....

लाभ घेण्याचे आ.सौ.श्वेता.महाले यांचे आवाहन..
(महेश गोंधणे):-चिखली विधानसभा मतदारसंघातील अपंग बांधवांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे दिव्यांग बोर्डाची स्थापना तसेच मोफत सोनोग्राफी सेवेच्या मशीनचे उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी, मंगळवार, रोजी आमदार सौ. श्वेता महाले यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय चिखली येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी व अपंग प्रमाणपत्र वितरणासाठी दिव्यांग बोर्ड नियमित कार्यरत राहील.यामुळे चिखली तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी आता जिल्हा मुख्यालया पर्यंत जावे लागणार नाही.ग्रामीण भागातील लोकांसाठी ही मोठी सोय ठरणारआहे.ग्रामीण रुग्णालयात आता गर्भवती महिलांसाठी मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार असून,या सोयीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमाबाबत आमदार सौ. श्वेता महाले  म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक सुविधा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, ही माझी प्राथमिकता आहे. दिव्यांग बांधवांसाठी दरमहा चिखलीतच  अपंग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था झाली आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध झाल्याने मातांसाठी सुरक्षित गर्भधारणा व आरोग्यदायी मातृत्वाचा मार्ग अधिक सुकर होईल.
या दोन्ही सुविधा चिखलीतील सर्वसामान्य जनतेसाठी आशीर्वादासारख्या ठरतील.त्यातून मिळणारा सामान्य जनतेचा आशीर्वाद हाच आमचा सर्वात मोठ पाठिंबा राहणार आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अपंग व गर्भवती महिलांना जिल्हा मुख्यालय गाठण्याचा त्रास व प्रवासखर्च वाचणार असून स्थानिक पातळीवरच आरोग्य सेवा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक जनप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.सौ.श्वेता महाले यांनी केले आहे.
Previous Post Next Post