अधिकारी (सामाजिक वनीकरण) या विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे स्नेहसंमेलन यवतमाळ येथे एम. डब्ल्यू. पॅलेस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी तब्बल चाळीस वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले आहेत. दिनांक ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (दि. ११) दुपारी प्रदीप वादाफळे आणि लता तौर
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय वादाफळे, के.एम. मेंढे, संजय मारने, दिगंबर भुयार, भरत गावडे, देवराव टाले यांच्यासह, नाशिक, पुणे, ठाणे, नागपूर, संभाजीनगर, अमरावती या प्रादेशिक विभागातील वनवृत्तातील बुलढाणा विभागाचे अशोक पंडागळे, साहेबराव पवार,गजानन भगत,ओमप्रकाश गोंधणे,अकोला सुरजुसे, देशमुख, चांदा ते बांदा जवळपास २००सेवानिवृत्त अधिकारी सहभागी होऊन, महाराष्ट्रात असे एकमेव स्नेह संमेलन सुरू आहे. सर्व सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील पुरुष व महिला अधिकारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा सहभाग होता. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच 'आठवणींचा गोषवारा' यासह विविध कार्यक्रम, आनंद मेळावा आणि 'स्मारिका' (स्मरणिका) वितरित करण्यात आली. विशेषतः यावेळी वृक्षपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी वानखेडे यांनी केले, तर सुनील खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.