तालुक्यातील किन्होळा येथील घटनेने खळबळ !

चिखली आगारातील वाहक कर्मचाऱ्याने घेतला गळफास..
चिखली आगार विभागात वाहक पदावर कार्यरत असलेले ३५ वर्षीय मिलिंद विजय जाधव यांनी शेतात  एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली, ही घटना तालुक्यातील किन्होळा येथे  आज ९ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप उघड होऊ शकले नाही.
चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी असलेले ३५ वर्षीय मिलिंद विजय जाधव हे चिखली एसटी आगार विभागात वाहक या पदावर कार्यरत होते.
तसेच त्यांची पत्नीसुध्दा चिखली डेपोमध्येच वाहक पदावर कार्यरत आहे.त्यांना दीड वर्षाची मुलगी व आठ वर्षाचा मुलगा आहे.अख्ख कुटुंब आनंदात राहत होते. त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते मंगळवारी घरी राहिले.मात्र सायंकाळी घरात कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेल्याचे समजते दुसऱ्या दिवशी त्यांची ड्युटी असल्याने चिखली आगार विभागातून त्यांना फोन लावण्यात आला.प्राप्त माहितीनुसार त्यांचा फोन त्यांच्या पत्नीने उचलला आणि सांगितले  की, ते घरी नाही बाहेर गेले आहेत घरी आल्यानंतर पाठवते.परंतु तीन दिवस झाले तरी ते घरी परतलेच नसल्याने घरच्यांनी शोध घेणे सुरू केले असता ते कुठेही आढळले नाही.मात्र दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी शेळ्या चरण्यासाठी काही लोक शेतात गेले असता, त्यांना शेतात मिलिंद विजय जाधव यांचे प्रेत एका लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेवून लटकलेले दिसून आले त्यांनी लगेच या घटनेची माहिती गावात दिली. ही माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेला प्रकार पोलिसांना व आगार व्यवस्थापक यांना कळविला असता आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, लामकाने व पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला. वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण समजले नाही. अशा घटनेमुळे गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.
Previous Post Next Post