चिखली(महेश गोंधणे):-सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत सक्रियपणे सहभागी असणारे ,सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील समस्या ,प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय नियम, अधिनियम कायदा दुरूस्ती समिती मध्ये ते सदस्य होते, सार्वजनिक ग्रंथालयाचे जिल्हा ,विभाग राज्य अशा विविध पदावर काम केले असुन त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असुन,त्यांची अभ्यासपूर्ण पण ओघावत्या रसाळ भाषेतील अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे जे वाचनिय असतात.त्यांना या क्षेत्रातील " कै. ऍड त्र्यंबकदासजी झवंर स्मृती- (लातुर )राज्यस्तरीय "आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता - ग्रंथमित्र "पुरस्कार २०२१ मध्ये मिळाला असुन या क्षेत्रातील कार्यासठीचा स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार - परभणी हा राज्य स्तरीय "सेवा गौरव पुरस्कार" मिळाला असुन,वाचन संस्कृती वृद्धिंगत होऊन तीचे संवर्धनासाठी सतत सक्रियपणे सहभागी असतात यासाठी ते या क्षेत्रातील "ग्रंथालय भारती" या संघटनेच्या "राष्ट्रीय सचिव"पदाचे माध्यमातून पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.गेल्या विस वर्षाच्या कालखंडानंतर चळवळीतील सर्वांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री ना.देवेद्रजी फडणविस आणि ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी हि समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन ग्रंथालय चळवळीस बळ दिले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य स्तरीय राज्य ग्रंथालय परीषद समीतीचे अध्यक्ष ना.चंद्रकांतदादा पाटील उच्च तंत्रशिक्षण मंत्री असुन या समिती मध्ये सुनील वायाळ यांची सदस्य म्हणून निवड केली आहे, त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन केले जात असुन.ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजशेखर बालेकर,कार्याध्यक्ष रविंद्र पांडे,डॉ.शिल्पा रसाळ सहसचिव,डॉअभय टोंगो,यशवंतराव पाटील,चंद्रकांत जोशी डॉ.प्रा.ब्रिजवाशि,गुलाबराव मगर,अशोक वाडीकर,डॉ.अनुजा कुळकर्णी पाठक ग्रंथालय चळवळीतील बांधवांनी अभिनंदन केले आहे.