"चला धावूया देशासाठी, सक्षम भारतासाठी" या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन युवकांमध्ये देशभक्ती, एकता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारी ठरणार आहे.युवकांनो, हीच वेळ आहे देशासाठी धावण्याची! चला, सहभागी व्हा आणि या ऐतिहासिक मॅरेथॉनचा भाग बना!असे आवाहन भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांनी केले आहे.
या मॅरेथॉनमध्ये पुरुष व महिला गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात येणार असून आकर्षक बक्षिसांची सोय ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवेश मोफत असून नोंदणीसाठी सोयीस्कर QR Codeचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तसेच परिसरातील युवकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश द्यावा,असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.