या वर्षी संघ आपले स्थापनेचे १०० वर्ष पूर्ण करत असून,विजया दशमीला संघ आपला स्थापना दिवस साजरा करतो ,१९२५ मधे विजयादशमीला डॉ.बळीराम कृष्ण हेडगेवार यांनी याची सुरुवात केली होती. संघाच्या या शताब्दी वर्षाचे हे ऐतिहासिक पर्व असणार आहे.
नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला संघाचा विजयादशमी सोहळा साजरा होणार असून या समारोहाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख उपस्थिती मधे हजर राहणारे ते दुसरे राष्ट्रपती असणार आहे ,या पूर्वी २०१८ मधे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.५ ऑक्टोबरला अमरावती येथे विजयादशमी सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आई कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते.दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.सध्या त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे स्मारक समितीचे सदस्य आहेत.या परिवारातील कमलताई गवई संघाच्या शताब्दीसोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे.