सर्व जातीय विधवा, घटस्फोटीत महिला, वधू-वर परिचय मेळावाचे आयोजन...

चिखली (महेश गोंधणे):- संजीवनी बहु शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता.चिखली जि.बुलढाणा आयोजित सर्व जातीय विधवा, घटस्फोटीत, अपंग, वर वधू परिचय मेळावा व पुरस्कार वितरण सोहळाया चे आयोजन संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय विभाग सभागृह बुलढाणा या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक ०५/१०/२०२५ रोज रविवारला वेळ स. ११ ते ५ या वेळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, जलसंधारण विभाग तथा मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले,माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, खा.प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर,आ.संजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, कवी, डॉक्टर,
लेखक, पत्रकार, संस्था, महिला बचत गट, पतसंस्था, वकील, इंजिनिअर इत्यादी मान्यवरांचा सहभाग असून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी इच्छुक महिला व इच्छुक पुरुष यांनी आपले परिचय पत्र संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावे. व्हाट्सअप द्वारे खालील नंबर वरती व्हाट्सअप परिचय पत्र द्यावे जेणेकरून आपली नोंदणी करता येईल. संपर्क:- डॉ निवृत्ती जाधव ९८२२९४३२३२ संस्था कार्यालय चिखली जाफराबाद रोड संजीवनी निवास संपर्क नंबर ७५८८८४६९७२ या या दोन्हीही नंबर वरती आपले परिचय पत्र ऑनलाइन सादर करावे व परिचय मेळाव्यासाठी वेळ सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय सभागृह बुलढाणा येथे उपस्थित रहावे असे आवाहन संजीवनी संस्थेचे अध्यक्ष डॉ निवृत्ती जाधव यांनी केले आहे.
Previous Post Next Post