चिखली तालुक्यातील ग्राम केळवद येथील संजीवनी संस्थेला नॅशनल आयकॉन २०२५ पुरस्कार प्राप्त..

चिखली(महेश गोंधणे):-हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने केळवद येथील संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेला नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ.निवृत्ती जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेने गेली १८ वर्षे अविरतपणे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.तसेच महिला प्रशिक्षण,एक गाव एक गणपतीफ, 'एक पेड माँ के नाम', 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'एक गाव एक लग्नातीथ', युवक-युवतींना प्रशिक्षण, युवकांसाठी व्यायामशाळा आणि गाव तेथे
वाचनालय सारखे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेने राबवले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दैनिक कर्णधार परीवार मलकापूर आणि हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच पत्रकार संघाच्या अध्यक्ष धनश्री काटेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ.निवृत्ती विठ्ठल जाधव अध्यक्ष संजिवनी बहु.शिक्षण प्रसारक संस्था,केळवद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारांच्या वतीने देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारामुळे संजीवनी संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून,पत्रकारांना सुद्धा आनंद होत आहे संजीवनी बहुउद्देशीय संस्था बुलढाणा जिल्ह्यात
कार्यरत असून या संस्थेचे कार्य कर्तुत्व छान आहे तसेच ०५/१०/२०२५ ला या संस्थेच्या वतीने विविध पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वन्यजीव सोयरे,शाहीर, कलावंत इत्यादी मान्यवरांना २५ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याबाबत ची माहिती निवृत्ती जाधव यांनी दिली आहे.
Previous Post Next Post