हकीकत अशी की १४ सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा पो. स्टे हद्दीत एक ट्रक विना परवाना अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान सदर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला नाकेबंदी करून,वरून पाहणी केली असता एक ट्रकमध्ये अंदाजे ४०,००० रुपये किमतीची ४ ब्रास वाळू आढळून आली. ट्रक व वाळू असा एकुण ३५,४०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी एएसआय ओमप्रकाश सावळे स्थागुशा यांच्या तक्रारी वरून आरोपी विरोधात कलम ३०३ (२) बीएनएस सहकलम २१(१), २१(२) गौणखनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कारवाई एएसआय राजकुमार राजपूत,एएसआय ओमप्रकाश सावळे, एचसी गजानन दराडे, एचसी जगदेव टेकाळे,पीसी दीपक वायाळ व चालक विकास देशमुख या पथकाने केली आहे.