सर्वत्र हळहळ वरखेड येथील रॉकेल घेतलेल्या युवकाचा मृत्यु...

चिखली(महेश गोंधणे):-तालुक्यातील अमडापुर पोलीस स्टेशन हद्दीत एका युवकाने स्वतः वर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सविस्तर असे के अमडापूर अंतर्गत येणाऱ्या वरखेड या गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या घरातच स्वतःवर रॉकेल ओतून पेट घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृत युवकाचे नाव नितीन दत्तात्रय धोंडगे (वय ३०) असे असून,या युवकाने ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने त्याला तत्काळ बुलडाणा येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश येत अखेर १२ सप्टेंबर रोजी रात्री ९.४४ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या दुःखद घटनेमुळे  धोंडगे कुटुंबावर  शोककळा पसरली असून, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Previous Post Next Post