स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...

चिखली (महेश गोंधणे):- स्थानिक गुन्हे शाखा  यांची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,अप्पर पोलीस अधीक्षक श्रोणिक लोढा खामगाव, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान चिखली हद्दीत स्थागुशा पथक गस्त घालत असताना,अवैध ८ब्रास वाळूचे विना परवाना  वाहतूक करतांना दोन ट्रक जप्त केले आहे. ८०,००० रुपये किंमतीची वाळू व ट्रक असा ५०,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीत २८ऑगस्ट रोजी मलगी फाट्या नजीक दोन ट्रक विना परवाना अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान सदर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला नाकेबंदी करून झाडाझडती घेतली असता, दोन्ही ट्रकमध्ये ८०,००० रुपये किमतीची ८ ब्रास वाळू आढळून आली. ट्रक व वाळू असा एकुण ५०,८०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी विरोधात कलम ३०३ (२) बीएनएस सहकलम २१(१), २१(२) गौणखनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची  कारवाई एएसआय राजकुमार राजपूत, ओमप्रकाश सावळे, एचसी गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, दीपक वायाळ या पथकाने केली आहे.
Previous Post Next Post