बतावणी करुन वयोवृदध इसमांना लुटणा-या सराईत गुन्हेगारास चिखली डीबी पथकाने जळगाव खान्देश येथुन २४ तासाचे आत केले जेरबंद.
(महेश गोंधणे):-पोलीस स्टेशन चिखली येथे दिनांक २६/०८/२०२५ रोजी फिर्यादी दगडु विठोबा सोळंकी वय ८३ वर्षे, रा. चांधई ता. चिखली ह.मु. राऊतवाडी स्टॉप जवळ चिखली ता.चिखली यांनी पोस्टेला रिपोर्ट दिला की, दिनांक २५/०८/२०२५ रोजी चिखली शहरा मधील आठवडी बाजार असल्याने फिर्यादी हे एकटे भाजीपाला आण्या करीता गेले. पारधी बाबा मंदीरा जवळील अंबीका जनरल स्टोअर्स समोर १५.०० वा ते १५.३० वाजता सुमारास फिर्यादी हे भाजीपाला घेत असताना तेथे एक अनोळखी इसम आला व त्यांने वयोवृध्द फिर्यादी याना तुम्ही मला ओळखता का मी तुमचा नातेवाईक आहे असे म्हणून तुमच्या उजव्या हाताचे बोटा मध्ये जशी सोन्याची अंगठी आहे तशी अंगठी मला घ्याची आहे, तुम्ही घेवुन दया, अंगठीचे मी पैसे देतो, तुमच्या बोटामधील अंगठीवर कोणता होलमार्क आहे ते पाहु दया असे म्हणाला त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना होलमार्क पाहण्या करीता त्यांची सोन्याची अंगठी वजनी ५ ग्रॅम किमत ३००००/- रू किंमतीची काढून दिली असता त्यावेळी अनोळखी इसमाने फियांदी यांना तुम्ही बाजार करा मी थैली घेवन येतो असे म्हणून फिर्यादी यांची सोन्याची अंगठी वजनी अंदाजे ५ ग्रॅम किमत ३०,०००/- रू किंमतीची बतावणी करून चोरी करून चोरून नेली अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून ६७३/२०२५ कलम ३०३(२), ३१८(४) भा.न्याय संहीता प्रमाणे फिर्यादी यांनी पोस्टेला अज्ञात इसमा विरूध्द तक्रार दिल्या वरून सदरचा गुन्हा दाखल केला असता.
सदर गुन्हयाचे संबंधाने ठाणेदार मा पो.नि.संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथक यांना गुन्हयासंदर्भाने सखोल तपास करणे व आरोपी शोधकामी सुचना देण्यात आल्या होत्या. वरुन डि.बी. पथकाचे पोना अमोल गवई यांनी खामगाव पो स्टे चे रविद्र कन्नरायाना फोन लावून सदर घटनेबाबत विचारपुस केली असता पो स्टे खामगाव येथे २०२४ मध्ये अशा प्रकारे गुन्हा घडल्याबाबत समजले वरुन सदरचा आरोपी हा जळगाव खांन्देश येथील असल्याबाबत माहिती मिळाली असता आरोपी शोधकामी दि २६/०८/२५ रोजी डि बी पथकाचे पोउपनी समाधान बडने, पोना अमोल गवई, पोकों प्रशांत धंदर, निलेश सावळे असे जळगाव खांन्देश येथे जावुन तेथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे मदतीने सदर आरोपी यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने तसेच त्याने चोरी केलेला मुददेमाल जप्त करुन पोलीस स्टेशन चिखली येथे हजर केले पुढील तपास पोहेका विजय गिते, मदतणीस सुधाकर पाडळे हे करत आहे.
सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक निलेश तांबे बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड बुलडाणा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे परीपोउपनि समाधान वडणे,सफी राजेंद्र काळे ,पोना अमोल गवई ,पोको प्रशांत धंदर , पोकों अजय इटावा , पंढरीनाथ मिसाळ, निलेश साबळे, राहुल पायघन , मपोको रुपाली उगले ,पोहेका विजय गिते ,मदतणीस सुधाकर पाडळे पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे सदर आरोपी विरोधात महाराष्ट्रामधे विविध पोलीस स्टेशन ला आतापर्यंत अशा प्रकारचे २५ गुन्हयाची नोद आहे.