आ. सौ.श्वेता महाले यांच्या उपस्थितीत भाजपात मोठ्या प्रमाणात नवप्रवेश...

सवना येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उत्साहात अनावरण...


महेश गोंधणे-

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले  यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मौजे सवना येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. या प्रेरणादायी सोहळ्यात ६० हून अधिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी त्या म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा' हा संदेश समाजाच्या प्रगतीचा खरा पाया आहे. त्यांच्या विचारांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा जागर सतत होत राहील.


आमदार श्वेता महाले यांनी सवनावासीयांसाठी महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्राचे महसूलमंत्री  बावनकुळे यांनी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, सवना येथील १९४ घरांची अतिक्रमणे नियमानुकूल होतील. संबंधित नागरिकांनी आपले प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तत्काळ सादर करावेत. जागा नियमानुकूल झाल्यानंतर येथे सभामंडप व अभ्यासिका उभारण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून गौतम गायकवाड,गजानन गायकवाड, सर्जेराव जाधव यांच्यासह गावातील ६० हून अधिक नागरिकांनी भाजपात प्रवेश केला. आमदार श्वेता महाले यांनी सर्व नवप्रवेशितांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना उज्ज्वल राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास सरपंच रवींद्र शिरसाठ,किशोर जामदार, ग्रामपंचायत सदस्य अनुरथ भुतेकर,किन्होळा सरपंच जाधव,सचिन भुतेकर, समाधान पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

"सर्वांच्या सहकार्याने सवना गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल "असा विश्वास आमदार श्वेता महाले  यांनी व्यक्त केला...


Previous Post Next Post