बुलडाणा सायबर पेालीस स्टेशनची यशस्वी कामगिरी...

 बुलडाणा सायबर पेालीस स्टेशनची यशस्वी कामगिरी


महेश गोंधणे-

घडलेल्या घटनेची हकीकत अशी की फिर्यादी नामे सचिन विनायक जपे रा. देऊळगांव राजा यांना दिनांक 23/02/2026 रोजी अज्ञात व्यक्तीने Whats App व्दारे .Apk फाईल पाठवुन त्यांचे मोबाईलमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन , त्यांचे मोबाईल नंबर वरील SMS वेगवेगळया मोबाईल क्रमांकावर Forword करुन त्यांचे बँक खात्यामधुन एकुण 1051602/- रुपये वेगवेगळया खात्यावर वळती करुन फिर्यादी यांची ऑनलाईल आर्थिक फसवणुक केली अशा फिर्यादी यांचे फिर्यादवरुन सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे दिनांक 07/04/2026 रोजी गु र नं 08/2026  भा.न्या. संहिता कलम 318(4) सह कलम 66(C)(D) IT Act प्रमाणे दाखल करण्यात आला. 

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये फिर्यादी यांचे बँक खात्यामधुन वळती झालेले रक्कम ज्या ज्या बँक खात्यामध्ये वळती झाले होते असे बँक खाते गोठविण्यात येवुन फिर्यादी यांचे फसवुणक झालेले रक्कमेपैकी 8,57,470/- रुपये हे न्यायालयाचे आदेशान्वये फिर्यादी यांचे बॅक खात्यामध्ये यशस्वी रित्या परत जमा करण्यात आले आहे. 

सदरची कारवाई  निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अमेाल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्रेणीक लोढा अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा चे तपास पथक  संग्रामसिंह पाटील, पोलीस निरीक्षक, प्रमोद इंगळे सहायक पोलीस निरीक्षक, पोहवा/1079  रामेश्वर मुंढे , पोहवा/970 भारत किसन जंगले, पोलीस अंमलदार /1477 केशव घुबे सर्व सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. 


सर्व नागरिकांना निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचेकडुन  आवाहन करण्यात येते की, सायबर गुन्हेगार अनेकदा .apk फाईलचा वापर करून मोबाईलमध्ये घातक अॅप इन्स्टॉल करायला लावतात आणि त्याद्वारे आर्थिक फसवणूक, डेटा चोरी किंवा मोबाईलचा ताबा घेतात. Android मध्ये .apk म्हणजे App Package File असते. Play Store बाहेरून आलेली संशयास्पद APK फाईल धोकादायक असू शकते.

जर चुकून APK इन्स्टॉल झाली असेल तर ताबडतोब: 1) इंटरनेट बंद करा 2) संशयास्पद अॅतप uninstall करा 3) सर्व passwords बदला 4) बँकेला कळवा,UPI/block करा,,5) Factory reset करण्याचा विचार करा अथवा  राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा , ऑनलाइन तक्रार cybercrime.gov.in⁠ 

महत्त्वाची सूचना

कोणतीही .apk फाईल: पोलिस,बँक,RBI,सरकारी योजना  यांच्या नावाने आली तरी खात्रीशिवाय इन्स्टॉल करू नका. बहुतेक वेळा अशा फाईल्स फसवणुकीसाठीच वापरल्या जातात.

Previous Post Next Post