चिखली विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या विकासाच्या वाटचालीत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश...

विदर्भ वंदन न्युज(महेश गोंधणे)                                                                                                                    

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का...


देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत आज चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार सौ. श्वेताताई महाले  यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात  संपन्न झाला.


प्रवेश घेणाऱ्यात  नंदू भाऊ सवडतकर (माजी नगराध्यक्ष, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखली), अरविंद देशमुख (संचालक खरेदी विक्री, संचालक जिनिंग प्रेसिंग चिखली, माजी सभापती पंचायत समिती चिखली), डॉ.गुलाबराव सपकाळ, राहुल सवडतकर (काँग्रेस शहराध्यक्ष, चिखली), दयानंद खरात (माजी उपसभापती, चिखली), दिलीप नरवाडे (माजी सरपंच, शेलोडी), प्रा. विजय घ्याळ (शेलसुर), सरपंच अरुण सरनाईक (शेळगाव जहागीर), जगन्नाथ अंभोरे, सरपंच अनिल फेपाळे (रुईखेड), शिवाजी नपते (उपसरपंच), सतीश वाघमारे, गणेश फेपाळे, राहुल काकफळे, सिद्धार्थ मगर (सर्व ग्रामपंचायत सदस्य, रुईखेड), भागवत नेवरे, ज्ञानेश्वर रामेकर (माजी उपसरपंच), शेणफड नेमणार, अमोल काकडे (भालगाव), नितिन घेवंदे (माजी उपसरपंच, शेलगाव/अन्वी गट ग्रामपंचायत), सागर सुरडकर (सदस्य ग्रामपंचायत), मदन आंभोरे, अमोल सरनाईक, गजानन ठेंग,गजानन चव्हाण, नितिन आंभोरे यांनी भाजपात प्रवेश केला.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हा जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाच गृहजिल्हा आहे. तरीही येथून मोठ्या प्रमाणात काँग्रेसजन भाजपासह अन्य पक्षांत जात असल्याने काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. या पक्षांतराच्या लाटेमागे केवळ भाजपाचे आकर्षण हेच एकमेव कारण नसून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हुल बोंद्रे यांचा कार्यकर्त्यांशी वागण्याचा स्वभाव आणि त्यांची कार्यशैलीही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे जाणकार राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्षांच्या स्वतःच्या जिल्ह्यात पक्षाचे हे विघटन काँग्रेससाठी मोठी नामुष्की ठरत आहे.

 त्याचबरोबर महायुती सरकार आणि चिखली विधानसभा मतदारसंघात आ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वात सुरू असलेला विकास व शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी आमदार सौ.श्वेता महाले  यांच्याकडून सुरू असलेली विकास कामे यामुळे प्रभावित होऊन आपला कल विकासासोबत असल्याचे, त्याचबरोबर देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासावर देश शिक्कामोर्तब करत असताना देशासोबत राहण्याचे आपण मान्य करत असल्याचे व त्यामुळेच भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे प्रवेशित म्हणाले.

या सोहळ्यास चिखली नगर परिषदेचे अध्यक्ष मा. पंडितदादा देशमुख, शहराध्यक्ष सागर पुरोहित, तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, सुधीर तांबट, नगरसेवक दीपक खरात, अनिल सपकाळ, गजानन पवार, सचिन गरड यांच्यासह गजानन परिहार, धनंजय भगत,विजय वाळेकर (शहराध्यक्ष, युवा मोर्चा), सागर वायाळ,अच्युतराव रिंढे  उपस्थित होते...

Previous Post Next Post