“गौसंरक्षण आंदोलनाला मोठे यश; युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराजांच्या भेटीनंतर प्रशासन झुकले”


विदर्भ वंदन न्यूज-(महेश गोंधणे)

चिखली शहरात गौसंरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले. सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा समितीचे मुख्य संयोजक व अंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज (काशी – वाराणसी) यांनी आज उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व प्रशासनाशी चर्चा करून आंदोलनाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

गौसेवा संरक्षणासाठी ओमराजे गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. चिखली शहरात अवैध गौकत्तल थांबवावी, गौमांस विक्रीवर बंदी आणावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या होत्या.युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.प्रशासनाने लेखी आदेश देत पुढील २४ तासांच्या आत चिखली शहरातील खुलेआम मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून ती बंद करण्यात येईल, तसेच शहरातील अवैध गौकत्तलखाने बंद करण्यासाठी व गौमांस विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.या निर्णयानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी बोलताना महाराज म्हणाले की, गौमाता ही सनातन हिंदू धर्मात पूजनीय असून तिचे संरक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अवैध गौकत्तल व गौमांस विक्री थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.प्रशासनाच्या आश्वासनानंतर युवाचार्य विवेक दास शास्त्री महाराज यांच्या हस्ते तसेच प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांचे आमरण उपोषण सोडविण्यात आले.या प्रसंगी शैलेश गोंधणे,  राकेश चोपडा, श्रीराम शर्मा, गजानन महाराज सपकाळ,  प्रशांत जैवाळ, संतोष भुतेकर,भरत जोगदंडे, साखळी उपोषन कर्ते श्रावण गवारे ,निखिल गोरे ,गौरव गुजर, शुभम शेळके, सोहम वैजानकर ,पवन जाधव ,सौरभ जाधव ,जीवन जाधव, सोनू रोकडे आदित्य शिंदे  सहित गौसेवा समितीचे सदस्य, सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.

Previous Post Next Post