कार्यक्रमास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास भाडाईत, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, तालुकाध्यक्ष संतोष परिहार, बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर खेडेकर, संचालक गजानन पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल वाकोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा फेटे बांधून तसेच भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार देखील करण्यात आला.चिखली शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पत्रकारांच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी, शुगर, किडनी, लिव्हर, थायरॉईड, रक्ततपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने पत्रकारांनी घेतला.
प्रमुख भाषणात राजेंद्र काळे यांनी चिखली शहरातील पत्रकारितेच्या उज्ज्वल इतिहासाचा आढावा घेत चिखली तालुका पत्रकार संघ ही परंपरा नेटाने जोपासत असल्याबद्दल कौतुक केले. पुरस्कारांच्या माध्यमातून भविष्यातही येथील पत्रकार अधिक सकस पत्रकारिता करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रणजीत राजपूत यांनी चिखली तालुका पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांमुळे पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात नितीन फुलझाडे यांनी आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना रमाकांत कपूर यांनी सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव रेणुकादास मुळे यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष कैलास गाडेकर यांनी केले. संस्थेचे संचालक इफ्तेखार खान यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भिकू लोळगे यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष लोखंडे, उपाध्यक्ष कैलास शर्मा, सहसचिव रवींद्र फोलाने यांच्यासह चिखली तालुका पत्रकार संघाचे सचिव महेश गोंधणे, सहसचिव रमीज राजा, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, संघटक भरत जोगदंडे, ज्येष्ठ सदस्य नितीन गुंजाळकर, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, इमरान शाह, सत्य कुटे, तौफिक अहमद, साबीर शेख, राजेंद्र बिडवे तसेच हरिहर सोळंके, मुक्तार शेख, गणेश अंभोरे, विनोद कुटे, विष्णू पंडित यांनी विशेष पुढाकार घेतला.