आमदार श्वेता महाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र... प्रशासन गतिमान करण्याच्या सूचना..
(महेश गोंधणे):-चिखली विधानसभा मतदारसंघात धाड व परिसरामध्ये अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मक्याला कोंब फुटणे, बांध वाहून जाणे, जमीन खरडून जाणे अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आ.सौ.श्वेता महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
आ.श्वेताताईंच्या सूचनेनुसार आज धाड सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणीस आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी मौढाळा, जांब, बोदेगाव, ढगारपूर, म्हसला बु. व म्हसला खु. या गावांना भेट दिली. त्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
या पाहणी दौर्यात श्रीमती राठी,तलाठी वाघ,जांब, आडवे, कृषी अधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..