चिखली शहरामध्ये आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते ४२ कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण....


(महेश गोंधणे):-चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविण्यासाठी सुमारे ४२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळे आ.सौ. श्वेता महाले यांच्या हस्ते संपन्न झाले.
चिखली शहराचा दर्जा उंचावण्यासाठी व नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहून या विकासकामांना गती दिली आहे. शहरातील रस्ते काँक्रीटीकरण, नाली बांधकाम, डांबरीकरण, सौंदर्यीकरण, पथदीप व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उभारणीद्वारे चिखलीला आधुनिक आणि सुसज्ज शहर बनविण्याचा संकल्प या कामांतून स्पष्ट दिसून येतो.
या वेळी आ.सौ.श्वेता महाले म्हणाल्या की, चिखलीला विकसित शहराचे रूपडे देण्याचा आपला प्रयत्न असून त्यामध्ये महाराष्ट्र शासन व आपण स्वतः सतत प्रयत्नशील राहणार आहोत. चिखली हे वेगाने बदलणारे नगर झाले असून रस्ते, स्वच्छता, व्यापार आणि सुसंस्कृतपणा या सर्व बाबींमध्ये चिखली शहर नावारूपाला यावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायचे आहेत.
विकासाच्या दिशेने चिखली शहर वेगाने वाटचाल करत असून,आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात चिखली शहराचा चेहरा नव्याने उजळत आहे,आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सर्व नागरिकांनी ध्यानात घ्यावे असे उदगार चिखली भाजपा नेते पंडितदादा देशमुख यांनी काढले.
या वेळी पंडित दादा देशमुख, अँड.विजय कोठारी (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), डॉ. संध्या कोठारी,सागर पुरोहित (शहराध्यक्ष), रामदास देव्हडे, रामकृष्ण दादा शेटे, विमलताई देव्हडे,ॲड.मंगेश व्यवहारे,सुदर्शन खरात, दीपक खरात, प्रा.वीरेंद्र वानखेडे,सुभाष झगडे,विष्णू मेथे,दत्ता सुसर,विजय वाळेकर,संजय आतार, विलास उबरहंडे,सौ.मयुरी जाधव, गोविंद देव्हडे,अमोल शेटे,युवराज भुसारी, रेणुकदास मुळे,शैलेश सोनूने, सौ.ममता बाहेती,दीपक काळे,विजय खरे,चेतन देशमुख,धनंजय व्यवहारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post