(महेश गोंधणे):-भारतातील सर्वात मोठी आनलाईन व ऑफलाईन हिन्दूस्थानी शास्रीय ख्याल गायन स्पर्धेत सहभाग घेत चंद्रशेखर कैलास कोल्हे भारतातून तृतीय विजेता ठरला आहे.
ही स्पर्धा पुणे येथे आयोजित आली करण्यात होती. या स्पर्धेत त्याने 'राग मारवा छोटा ख्याल व राग पुरिया हा बडा ख्याल' सादर करून त्या दोन्ही रागामध्ये साम्य काय व भेद काय आहे, या दोनही विषयाचे समर्पक सादरीकरण करुन व उपस्थितांची मने जिंकली. या सर्व परिक्षणातून चंद्रशेखरने तृतीय क्रमांक मिळविला आहे. चंद्रशेखरकोल्हे हा डी. वाय. पाटील कॉलेज पुणे येथे इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षाला शिकत असून तो संगीत अलंकार गायन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे. चंद्रशेखर विशारद (तबला) असून चिखली तालुक्यातील धोडप या गावातील आहे. संगीताचे ज्ञान त्याला बालपणापासूनच आई वडिलांकडून मिळाले आहे. वडील कैलास कोल्हे हे सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे संगीत शिक्षक असून आई अनिता कोल्हे या संगीत विशारद आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे सर्वस्तरातून होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.