चिखली शहरातील सविता हिम्मतराव इंगळे या गतिमंद महिला व त्यांचा मुलगा कृष्णा हे शहरात भीक मागून उदरनिर्वाह करीत होते. दैनंदिन जगण्याच्या संघर्षात त्या अनेक अडचणींचा सामना करत असल्याची बाब खरे यांच्या निदर्शनास आली. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी कोणताही आर्थिक भार न पडू देता स्वतः पुढाकार घेत सविता इंगळे यांचे नवीन रेशन कार्ड तयार करून दिले.
तसेच पूर्वीच त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आ.सौ.श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण योजनेचा” लाभ सुद्धा त्या महिलेला मिळवून दिला होता. या योजनेमुळे सविता इंगळे यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग त्या नागपूर येथे सुरु असलेल्या आपल्या उपचारांसाठी करतात,असे त्यांनी सांगितले.
या संवेदनशील व समाजाभिमुख कार्यामुळे सविता इंगळे या अत्यंत आनंदित व समाधानी आहेत.
विजयसिंग खरे म्हणाले, “आपल्या आ.सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रेरणेने चिखली शहरातील गोरगरीब,दिव्यांग व दिनदुबळ्या बांधवांची सेवा करण्याचे व्रत मी हाती घेतले आहे.समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.”
आज दिवाळीच्या शुभदिनी सविता इंगळे यांना रेशन कार्ड सुपूर्त करण्यात आले.या प्रसंगी पत्रकार कैलास गाडेकर,छोटू कांबळे,रविंद्र फोलाने,तेजराव सोनवणे ज्येष्ठ पत्रकार कृष्ण कुडके,माजी उपसरपंच सोनू इंगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्याबद्दल सामाजिक क्षेत्रात विजयसिंग खरे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाजातील अशा बांधिल कार्यकर्त्यांमुळे लोकसेवेचा खरा अर्थ आणि संवेदनाअधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.