नक्षलमुक्त महाराष्ट्रासाठी चिखलीच्या सुपुत्राचे योगदान अत्यंत अभिमानास्पद ...

चिखली:-(महेश गोंधणे) गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मोठ्या धैर्याने आणि कुशल नियोजनाने सीसी मेंबर सोनू सहित तब्बल ६० माओवादी सदस्यांना हत्यारांसह आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करणारे सी-६० दलाचे प्रभारी व प्राणहिता एपीआय राहुल नामदेवराव देव्हडे यांचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
देशामधील सर्वात मोठ नक्षली आत्मसमर्पण असलेले या मोहिमेमध्ये 6 कोटींचं बक्षीस असलेले नक्षलींचा टॉप कमांडर भुपती व अन्य 60 नक्षलवादी यांनी आपली शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवून संविधान हाती घेतले. या ऐतिहासिक मोहिमेसाठी राहुल देव्हडे यांचे प्रभारी अधिकारी म्हणून विशेष कार्य आहे अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या मोहिमेसाठी काम करत असताना काही दिवसापासून परिवारासोबत देखील त्यांचा संपर्क नव्हता, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भूपतीच्या शोध मोहिमेसाठी निघालेल्या संपूर्ण पथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती.        भूपतीच्या इच्छेप्रमाणे केवळ कोणत्याही एका अधिकाऱ्यासोबत विनाशस्त्र संभाषण करण्यासाठी तयार झालेल्या या टॉप कमांडर सोबत जीवाची कुठलीही पर्वान करताआपला जीव धोक्यात घालून प्रभारी अधिकारी या नात्याने आपले कौशल्य वापरून उच्चशिक्षित असलेल्या या कमांडर सोबत इंग्रजीमध्ये संभाषण करून आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडले.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षापासून नक्षली विरोधी मोहिमेमध्ये कार्यरत असणाऱ्या C-60 पथकामध्ये राहुल देव्हडे हे आपले कार्य चोख पणे बजावत आहेत.अनेक मोठमोठ्या मोहिमेची जबाबदारी स्वीकारत असताना अत्यंत कमी कालावधीत त्यांना राष्ट्रपती यांचे शौर्यपदक तथा पोलीस महासंचालक पदक देऊन गृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे देखील सन्मानित करण्यात आले आहे.
या कारवाईत देव्हडे यांनी केवळ माओवादी संघटनांशी संवाद साधत शांततेचा मार्गच दाखविला नाहीतर त्यांच्या गडातून सुखरूप गडचिरोलीपर्यंत आणण्याचा थरारक आणि धोकादायक प्रवास यशस्वीपणे पार पाडला. या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचा सन्मान अधिक वाढला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व कमांडर ऋषी विडपी यांच्या कार्याचेही कौतुक केले आणि राज्याच्या नक्षलविरोधी मोहिमेत या अधिकाऱ्यांनी निभावलेल्या भूमिकेचे अभिनंदन केले.
यामध्ये चिखलीचे सुपुत्र राहुल देव्हडे यांनी या धाडसी कार्यामुळे आपले गाव आणि मातृतीर्थ जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले.त्यांच्या कामगिरी बद्दल चिखली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चिखलीच्या सुपुत्रावर सर्व स्तरातुन अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post