जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर...

(महेश गोंधणे):-राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाईल. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. या यादीवर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता
अध्यक्षपद आरक्षण जाहीर
काही दिवसांपूर्वीच ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे, तर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. यासह उपाध्यक्ष आणि सभापतींचे आरक्षणही सरकारने जाहीर केले आहे.
येतील, तर अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदार यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे
किंवा नावे-पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे यासारखी कार्यवाही आयोगाकडून केली जात नाही.
हरकती व सूचनांद्वारे केवळ लेखनिकांच्या चुका, मतदाराचा निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण चुकून बदलणे, किंवा विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे यासारख्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार आहेत.
Previous Post Next Post