– आ.श्वेता महाले पाटील यांच्या कार्याचा ठसा
गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक हलकी स्मितरेषा उमटवणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या समाजातील निराधार, वंचित, दिन-दुबळ्या लोकांसाठी जीवनाचा आधार ठरल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनांचा लाभ मिळाला असला तरी चिखली विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लाभार्थ्यांसह नंबर एकवर आहे.
संपूर्ण जिल्ह्यात एकूण १,९३,०९६ लाभार्थी या योजनांमध्ये सामावलेले असताना, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २८,८३९ लाभार्थी चिखली विधानसभा मतदारसंघातून आहेत.ही आकडेवारी केवळ एक संख्या नसून, समाजातील दुर्बल घटकांना आधार देणारा जिवंत पुरावा आहे.
गोरगरीबांची नाळ सदैव जपणाऱ्या आ.सौ.श्वेता महाले यांच्या संवेदनशील मार्गदर्शनामुळेच हा बदल शक्य झाला आहे. त्यांना प्रशासनाकडून मिळणारे सहकार्य, तसेच त्यांनी गावोगावी ग्रामदूत म्हणून नियुक्त केलेली तरुण मुले –जी प्रशासन आणि सामान्य जनतेमध्ये दुवा बनून काम करतात –यांच्या प्रयत्नांमुळेच गोरगरिबांची कामे मार्गी लागत आहेत.
पिकविमा योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो की श्रावणबाळ योजना – प्रत्येक योजनेत चिखली विधानसभा मतदारसंघ आघाडीवर दिसतो. कारण, कार्यक्षम आमदार पाटील यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाचा दिलासा पोहोचवला आहे.
आज या योजनांमुळे निराधार विधवा माता,श्रवणबाळ, अपंग,वयोवृद्ध व दुर्बल घटक यांना आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला नवसंजीवनी मिळत आहे.चिखलीतील जनता सांगते –“हे केवळ सरकारी अनुदान नाही, तर आमच्या आमदारांच्या गोरगरीबांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा आणि ग्रामदूतांच्या सेवेचा ठसा आहे."
चिखली विधानसभा मतदारसंघातील हा विक्रम म्हणजे गोरगरिबांची खरी कदर करणाऱ्या जनतेच्या सेवकाच्या कार्याची पोचपावतीच आहे.