“दोन दिवसांत उपाय न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन” – श्रीराम झोरे यांचा इशारा
चिखली (महेश गोंधणे):-शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे मुक्तपणे फिरत असून,लंपी स्किन या धोकादायक आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उ.बा.ठा) व युवासेना यांच्या वतीने चिखली येथील पशुसंवर्धन विभागाला घेराव घालण्यात आला.
या वेळी शिवसेना नेते श्रीराम झोरे यांनी इशारा दिला की,
"लंपी आजार वेगाने पसरत आहे.तातडीने सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात यावे. दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू."
सभोवतालच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनीही या मागणीस जोरदार पाठिंबा दिला.
उपस्थित मान्यवर व पदाधिकारी
शिवसेना नेते श्रीराम झोरे
युवासेना शहरप्रमुख आनंद गैची माजी नगरसेवक श्याम शिंगणे उपशहरप्रमुख समाधान जाधव रवी पेटकर,बंटी कपूर,शंभू गाडेकर,अनिल जावरे,राहुल वरवंडे,सोहेल शाह,सचिन जोशी
तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चिखली नगरपालिकेला इशारा देत सांगितले की,"मोकाट जनावरांची सुरक्षित ठिकाणी तातडीने व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा शिवसेना आंदोलनाची धार आणखी तीव्र करेल."