दहा लाखाची रक्कम केली पसार...चोरट्यांनी फोडले स्टेट बँकेचे एटीएम....


चिखली(महेश गोंधणे):- शहरातील राऊतवाडीतीत असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी फोडले स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चा असलेला एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडत दहा लाखांहून अधिक रोकड लंपास केली.शहरातील राऊत वाडी परिसरात शनिवारी (२० सप्टेंबर) पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चा एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडत दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली. दुपारनंतर ही धाडसी चोरी उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ  उडाली असून प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगाचा स्प्रे मारून ते निष्क्रिय केले. त्यानंतर वायरींग कापून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा निकामी करण्यात आली. सर्व अडथळे दूर करत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले व रोकड उचलून नेलीघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून,अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या एटीएम फोडण्याचा घटनेमुळे  ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या गस्त व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून असल्या घटना पुन्हा घडू नये याची काळीजी घ्यावी असा सूर जनतेतुन निघत आहे.


Previous Post Next Post