चिखली तालुक्यातील अंबाशी या गावांमध्ये पाझर तलाव फुटून खूप नुकसान झाले आहे त्यामुळे या पाझर तलावाची संरक्षक भिंत तयार करण्यासाठी त्वरित अभियंत्यांनी कामाला लागावे अशा सूचना आ.श्वेताताई यांनी दिल्या.
पांढरदेव येथील अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्यामुळे नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांची तर जमीन खरडून गेली आहे,गावातील दोन्ही पूल या अतिवृष्टीने वाहून गेले आहे या पुलांसाठी प्रशासनाकडून तात्काळ मदत करण्यात येत आहे अशा वेळेस या शेतकऱ्यांसोबत शासन व प्रशासन दोन्ही उभे असल्याचे आ.सौ श्वेता महाले म्हणाल्या.
नुकसानग्रस्त गावातील सर्व शेतांचा सरसकट सर्वे करण्याचे आदेश आ.श्वेता महाले यांनी दिला असून अधिकाऱ्यांनी सुट्टीची कोणतीही पर्वा न करता लगेच सर्वे सुरू केले आहेत. अशा वेळेस ज्या शेतांची सर्वे होतील त्या सर्व शेतकरी व शेती गटाची यादी ग्रामपंचायत येथे लावण्यात येणार व सर्वेतील नुकसानग्रस्त क्षेत्राबाबत एखाद्याची तक्रार असेल तर त्याने ती लगेच ग्रामपंचायतला व संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदवायची आहे,गावातील सर्व नागरिकांच्या सहमतीनेच शासनाकडे नुकसान मागणीचा प्रस्ताव टाकणार असल्याबाबत आ.श्वेता महाले यांनी सुचित केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार हरी वीर,तालुका कृषी अधिकारी सुरडकर,सहाय्यक गटविकास अधिकारी पोपळे, कृषी अधिकारी कपिल कंकाळ व संबंधित सर्व गावांचे तलाठी ग्रामसेवक व कोतवाल हे हजर होते. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेताचे त्वरित सर्वे करून द्यावेत,या सर्वेच्या याद्या ग्रामपंचायतला लावाव्यात व कोणाचे काही आक्षेप असतील तर ते त्वरित नोंदवून घ्यावे,कुणावरही अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आ.श्वेता महाले यांच्याकडून देण्यात आल्या.
त्याचबरोबर सर्व गावातील जास्त नुकसान झालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना तहसील कडून सानुग्रह अनुदान म्हणून रुपये 5000 त्वरित देण्यात यावे अशा सूचनाही आ.श्वेता महाले यांनी संबंधितांना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू अंभोरे,लक्ष्मण अंभोरे,श्रीकृष्ण अंभोरे,सरपंच चेतन म्हस्के,वरखेडचे सरपंच विनोद कणखर,गणेश भगत,देविदास कणखर,समाधान कणखर,संदीप म्हस्के,राजेंद्र म्हस्के,अनुप म्हस्के,अमोल म्हस्के,तेजराव खेडेकर,योगेश म्हस्के,गणेश म्हस्के,रमेश कणखर,भारत सोळंकी, विष्णू मुंडे,रमेश आकाळ,गजानन पाटील,प्रदीप भुसारी,संतोष आकाळ,श्रीराम आकाळ,बद्रीनारायण काळे,अरुण म्हस्के,संदीप म्हस्के व महीमळ येथील हरिभाऊ येवले,गजानन पडघान व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.