चिखली(महेश गोंधणे):-महसूल विभागाचा नागरिकांच्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या, शेतकरी बांधवांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून महसुली उत्पन्न वाढवा,असे निर्देश आज राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा येथे दिले. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग, मुद्रांक शुल्क विभाग, नोंदणी विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील महसूलविषयक प्रलंबित प्रकरणे, नोंदणी प्रक्रियेतील सुलभीकरण, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन,शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निवारण आणि महसूल उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश महसूलमंत्री ना.बावनकुळेंनी दिले.
या बैठकीला राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर, आ.संजय गायकवाड, माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते .