चिखली विधानसभा मतदारसंघातील पांढरदेव व इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले.या पार्श्वभूमीवर आज चिखली येथे "देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था"चे उद्घाटनासाठी महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे आले असता कार्यक्रम स्थळीच आपल्या भाषणामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्य तत्पर आ.सौ श्वेता महाले यांनी अतिवृष्टी व काही दिवसापूर्वी हुमणी अळी या दोन नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई शासनाकडून त्वरित त्यांना प्राप्त व्हावी याकरता आपल्या भाषणातच महसूल मंत्र्यांना साकडे घातले.
रक्षाबंधनाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी स्थापन होत असलेल्या देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात चिखली च्या आ.श्वेता महाले यांनी महसूलमंत्र्यांना शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी ही मागणी केली त्यामुळे भारावलेल्या महसूलमंत्र्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेता महाले चिखली विधानसभा मतदारसंघाला लाभलेल्या आहे हे या मतदारसंघाचे भाग्य आहे असे आमदार महाले यांचे कौतुक केले.
त्याचबरोबर महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच चिखलीचे तहसीलदार यांनी संबंधित यंत्रणांना ताबडतोब सूचित करून अतिवृष्टीने बाधित चिखली तालुक्यातील भोरसाभोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे,पांढरदेव, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतकरी आणि तमाम नागरीकांना आर्थिक मदत द्यावी व नुकसानीचे पंचनामे त्वरित करून तसा अहवाल सादर करावा असे आदेश दिले. आ.सौ श्वेता महाले यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी आपली ताई सदैव आपल्या सोबत असल्याबद्दल खात्री निर्माण झाली आहे.