(महेश गोंधणे) :-जर तुमच्या वाहनावर अद्याप हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवलेली नसेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, HSRP लावण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 आहे. केवळ 3 दिवस उरले असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे.महाराष्ट्र सरकारने ही अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे,ज्यामध्ये सध्याची तारीख ही नवीनतम वाढ आहे .या तारखेनंतर पालन न केल्यास कडक अंमलबजावणी केली जाईल. (HSRP)प्लेटमध्ये लेसर कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक प्रणालीचा समावेश असतो, ज्यामुळे बनावट नंबर प्लेट्स टाळता येतात आणि वाहन चोरीस प्रतिबंध होतो. परिवहन विभागाने सांगितले की, 16 ऑगस्टपासून नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई सुरू होईल. नियम मोडल्यास प्रथम गुन्ह्यासाठी 5,000 रुपये, तर वारंवार नियमभंग केल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. गेल्या काही महिन्यांत सरकारने अंतिम मुदत तीन वेळा वाढवली- 30 एप्रिल, 30 जून, आणि सध्याची 15 ऑगस्ट. मात्र, आता यापुढे कोणतीही वाढ होणार नसल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.वाहन मालकांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन (HSRP) साठी ऑनलाइन बुकिंग करून आपल्या वाहनावर लवकरात लवकर ही प्लेट बसवावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. मोठ्या दंडाची आणि कायदेशीर कारवाईची वेळ येण्यापूर्वीच खबरदारी घ्या.तुमच्या वाहनाची सुरक्षा सुनिश्चित करा आणि तात्काळ (HSRP) लावा.
15 ऑगस्टनंतर होणार 5000 ₹ दंड ! वाहन धारकांनो व चालकांनो सावधान....वाचा का ?
byVidarbha vandan
-