अ.भा क्षत्रिय कोली कोरी समाज संगठन चिखलीच्या वतीने भुजरिया पूजन व विसर्जन संपन्न....

चिखली(महेश गोंधणे):- अखिल भारतीय कोली कोरी समाज संघटन चिखली शाखेच्या वतीने रक्षाबंधनाच्या मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते सुखकर्ता मंगल कार्यालयात भुजरिया उत्सव सोत्साह संपन्न झाला.स्थानिक सिद्ध सायन्स मंदिर मधे पूजन करून सुखकर्ता मंगल कार्यालयात समाजाच्या बंधू भगिनींच्या उपस्तिथीत कार्यक्रम घेण्यात आला.अतिप्राचीन या परंपरेची नाळ बुंदेलखंड उत्तर भारताशी जोडलेली असून श्रावण शुक्ल पक्षातील नवमी तिथीला गहू किंवा जव यांची पेरणी टोपली किंवा दुरडी मधे केली जाते व पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्याचे लेकी समजून पूजन केले जाते,या  भुजरिया देवांना व सर्व वडीलधारी मंडळींना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जाते.                               या कार्यक्रमात 10 वी व 12 वी च्या प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांना स्व.प्रल्हाद सोनाजी गोंधणे व स्व.कमल प्रल्हाद गोंधणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह देऊन आ.श्वेताताईंच्या हस्ते गौरवांवित करण्यात आले. सभा मंचावर समाजाचे स्थानिक अध्यक्ष दिलीप पठ्ठे कोरी कोली महिला शाखेचे यशोदा दानवे,माजी भाजपा अध्यक्ष पंडितराव देशमुख,डॉक्टर शिवप्रसाद गोंधणे,सदानंद मोरगंजे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय वाळेकर यांच्यासह गणमान्य उपस्थित होते याप्रसंगी भुजरीया कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आ.सौ श्वेताताई म्हणाल्या की चिखली शहरातील अगदी छोटे खानी समाज असताना सुद्धा एकता व धार्मिक भावना जपून दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करतात.याप्रसंगी त्यांनी समाज बांधवांना आश्वस्त केले की तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही तुमच्या विकास कार्यामध्ये सक्रिय राहुन समाजाचे विविध अंगाने विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शब्द देखील आमदार श्वेताताई महाले यांनी दिले  तसेच नगरपालिके कडून चिखली कोरी कोली समाजाला भूखंड देऊन 25 लक्ष रुपयांचा निधी प्रशासनाच्या वतीने लगेच देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या ,यावेळी चिखली शहरातील कोरी कोली समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी शैलेश गोंधणे,राजू चुनावाले,नितीन खुणारे,भारत दानवे,गोलू चुनेकर,बाळू मालवे यांनी परिश्रम घेतले या वेळी देविदास दानवे,आरएसएस पर्यावरण समिती जिल्हा प्रचारक व प्रांत सहसंयोजक ओमप्रकाश गोंधणे,प्रदीप चुनावाले,अशोक भिमेवाल,महेश गोंधणे,भारत दानवे,यांच्यासह कोरी कोली समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप कार्यकर्ता श्याम वाकतकर तर आभार प्रदर्शन निलय गोंधणे यांनी केले.
Previous Post Next Post