चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे सह इतर 23 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

( महेश गोंधणे ):- याबाबत सविस्तर वृत्त असे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून काँग्रेस कमिटीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी मी धावतो वोटचोरी  रोखण्यासाठी मॅरेथॉन (शालेय गट)स्पर्धा ठेवली होती याबाबत  मनसेचे शेतकरी सेलचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी जयस्तंभ चौक ते राऊतवाडी या भागामध्ये तसेच शहरातील इतर भागांमध्ये दुभाजकावर थोडे धावा शेतकऱ्यांचे शंभर कोटी जमा करण्यासाठी, मी धावतो शेतकऱ्यांच्या हक्काचे बँक चोरी करून, जोरात धावा सूतगीरणीने केलेली नोट चोरी रोखण्यासाठी,कारखाने बँका बुडून झाले आता धावाधाव कशाला ? इत्यादी मजकूर असलेले 3 x 3 चे 65 बॅनर  नगर परिषदेची परवानगी घेऊन लावले होते.आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता चे सुमारास जयस्तंभ चौकात हजर असताना चिखली शहरात काँग्रेस पक्षाचे वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली याबाबत सदरची मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राहुल बोंद्रे नितीन वाघ,राहुल सवडतकर,रिकी काकडे,कैलास जंगले,शेखर देशमुख,खलील बागवान,डॉक्टर इसरार,शिवराज बाबुराव पाटील,राम जाधव,अमित कोटवे अथरुद्दीन काजी,गोकुळ शिंगणे यांच्यासह इतर ८ ते 10 कार्यकर्त्यांनी गैर कायदेशीर जमाव जमवून जयस्तंभ चौकात आले व गोंधणे यांनी लावलेल्या वरील मजकुराचे फलक दुभाजकाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या सार्वजनिक विद्युत खांबावर अनाधिकृतपणे चढून खांबाचे नुकसान केले अशा प्रकारचे फलक लावणाऱ्यांना पाहून घेऊ आता त्यांना सोडायचे नाही असे म्हणून धमक्या देत होते व दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेसात वाजेचे सुमारास 22 ते 23 जणांनी मिळून गैर कायदेशीर जमा जमून अनाधिकृतपणे सार्वजनिक विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचे नुकसान केले तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाळून टाकण्याचा प्रयत्न करून 22 हजार रुपयांचे नुकसान केले आहे सदर इसमा विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी ही विनंती याबाबतीत चिखली पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे तोंडी रिपोर्ट दिल्याप्रमाणे संगणकावर टाईप करून चिखली पोलीस प्रशासनाने प्रिंट करून वाचून दाखविला व संबंधित काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे स इतर 22 ते 23 जणांवर कायदेशीर रित्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले या प्रकरणी चिखली पोलिसांनी क्रमांक 36 62 प्रमाणे दिनांक 31 ऑगस्ट 2025 प्रमाणेभारतीय न्याय संहिता 2023 189 ( 2 ) भारतीय न्याय संहिता 2023 (190 ) भारतीय न्याय संहिता 2023 324 (4 ) भारतीय न्याय संहिता 2023 329 (3 ) भारतीय न्याय संहिता 2023 351 (2 )महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (135) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 ( 3 ) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 (4) गुन्हे नोंद केले आहे याबाबतीत चिखली शहरांमध्ये खळबळ उडाली असून माजी आमदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहूल बोंद्रे  यांच्यासह इतर 22 ते 23 जणांवर भारतीय संविधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबतीत चिखली शहर व परिसरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार यांच्या गैरवर्तुणुकीबद्दल विविध कार्यकर्त्यांमध्ये चर्चा व तर्कवितर्क लावल्या जात आहेत याबाबतीत मनसे जिल्हा संघटक शेतकरी शैलेश गोंधणे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की आम्ही कायदेशीर रित्या नगरपालिकेची परवानगी घेऊन त्यांची फीज भरून हे बॅनर लावले होते वास्तविक पाहता या पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी वागू नये अशी अपेक्षा होती तरी देखील विविध कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल व विविध प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे पैशाची लुबाडणूक केली म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्याचे तात्पर्य पाहता काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार बोंद्रे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे तूर्तास दिसून येत आहे.
Previous Post Next Post