विदर्भ पंढरी श्री गजानन महाराजांची पालखी परततांना टोल घेऊ नये..आ.श्वेता महाले

चिखली(महेश गोंधणे):-अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान विदर्भ पंढरी श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वरून खामगाव मार्गे शेगावला उद्या पोहोचणार आहे. या पालखी सोबत हजारो भाविक काही पैदल तर काही गाड्यांनी पालखी सोबत जाणार असून विविध सेवा या गाड्यांकडून पुरविल्या जातात. भक्ती रसाचा सुरेख संगम असलेल्या या पालखी सोहळ्याच्या मार्गात असलेल्या टोलवर उद्या पालखी सोबत असलेल्या विविध वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना या संबंधात विनंती केली......कामे अशी मार्गी लागत असतात, उगीच एखाद्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला फोनवर धमकी देऊन त्याच्याशी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून खूप काही केल्याचा आव तर अनेक करतात.... विकासकन्या आ.श्वेताताई यांचे सर्व भक्त परिवारकडून आभार व्यक्त केल्या जात आहे.
Previous Post Next Post